Chemical-laced Mango : रसायनांच्या आहारी आंब्याचा सिझन

 चिखलीत रासायनिक आंब्यांचा सुळसुळाट !

आरोग्य धोक्यात : चिखलीत अनधिकृत रसायनांचा वापर वाढला





चिखली/( द बातमीवाला ) : सध्या आंब्याचा सिझन सुरू असून, चिखली शहरात आंब्यांच्या गोडसर चवीमागे मोठ्या प्रमाणावर रासायनिक पद्धतीने आंबे पिकवण्याचा गोरखधंदा तेजीत आहे. गवताचा वापर करून नैसर्गिकरित्या आंबे पिकवण्याऐवजी इथरेलसारख्या धोकादायक रसायनांचा वापर करून आंबे लवकर पिकवले जात आहेत.

गवताचा उष्णता निर्माण करणारा उपयोग मागे पडला असून, अनैतिक मार्गांनी आंबे बाजारात जलद विक्रीसाठी आणले जात आहेत. या रसायनांमुळे आंब्यातील पोषणतत्त्वे नष्ट होतात. तसेच, अशा आंब्यांचे सेवन केल्याने पोटदुखी, उलटी, मळमळ यांसारख्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. लहान मुले आणि ज्येष्ठांसाठी ही फळे अधिक धोकादायक ठरत आहेत. शहरातील विविध भागांत तात्पुरते गोडाऊन भाड्याने घेऊन कच्च्या आंब्यांवर रासायनिक प्रक्रिया केली जाते. दुर्गंधीयुक्त आणि बंदिस्त ठिकाणी या आंब्यांचे कृत्रिम पिकवणीचे प्रकार सुरू आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडे याची माहिती असूनही अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. व्यापारी नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत रसायनांचा वापर करत आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा विषय गंभीर आहे. प्रशासनाने तातडीने तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. तसेच, ग्राहकांनी जागरूक राहून नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यालाच प्राधान्य द्यावे, असा सल्ला आरोग्य तज्ञ देत आहेत.

तात्पुरत्या गोडाऊनमध्ये होतो अनैतिक व्यवसाय

शहरातील विविध भागांमध्ये भाड्याने तात्पुरती गोडाऊन घेऊन कच्च्या आंब्यांवर रासायनिक प्रक्रिया केली जाते. दुर्गंधीयुक्त आणि बंदिस्त जागेत आंबे पिकवले जात असल्याने परिसरातील नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाला याची पूर्ण कल्पना असूनही कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही.

प्रशासन जागे होणार का ?

चिखली शहरातील नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जर वेळेत कारवाई झाली नाही, तर रासायनिक आंब्यांच्या सेवनामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवण्याचा धोका आहे. प्रशासनाने यावर त्वरित लक्ष देऊन योग्य ती पावले उचलावी, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते.

Post a Comment

0 Comments