चिखलीत शिवसेनेत प्रवेशाचा महापूर, शिंदे गटाचा जोर वाढला !

चिखलीत शिंदे गटात इनकमिंगचा जोर, शिवसेनेत प्रवेशाचा धडाका



चिखली ( छोटू कांबळे) - चिखली तालुक्यात शिंदे गटातील शिवसेनेत इनकमिंगचा जोर वाढत असून,  केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास दाखवत आज दिनांक 17  फेब्रुवारी रोजी बुलढाणा येथील विश्रामगृह येथे चिखली पंचायत समितीचे माजी सदस्य नासेरभाई सौदागर, माजी सरपंच मधुकर हिवाळे, ग्रामपंचायत सदस्य मस्तान खान, माजी शिक्षण समिती अध्यक्ष मनोहर हिवाळे, उत्तम हिवाळे, प्रकाश हिवाळे, गजानन शिंगणे आणि शहबाज पटेल यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.  

   या पक्षप्रवेश कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, महिला जिल्हाप्रमुख मायाताई मस्के, तालुकाप्रमुख गजानन मोरे,  कपिल खेडेकर, शरद हाडे, नरेश राजपूत, अनमोल ढोरे पाटील, गजानन मस्के आदी प्रमुख नेते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.          

 या प्रसंगी बोलताना प्रतापराव जाधव यांनी नव्याने पक्षात आलेल्या सदस्यांचे स्वागत करत, चिखली तालुक्यातील विकास कार्ये अधिक गतीने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वांना एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. नवीन सदस्यांच्या प्रवेशाने पक्षाच्या बळात वाढ झाली असून, आगामी काळात तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. यामुळे चिखलीतील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या प्रभावात मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


Post a Comment

0 Comments