ओमनीत गॅस भरताना लागली आग ; अग्निशमन दलाने टाळला मोठा अनर्थ
रायपुर-सैलानी/(छोटू कांबळे ) : रायपुर जवळील सैलानी येथे दिनांक १२ मार्च रोजी दुपारी ३:३० वाजता ओमनी वाहनात गॅस भरताना गॅस लीक झाल्यामुळे अचानक आग लागली. या आगीत ओमनी वाहन (क्रमांक MH-15-R-4209) संपूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नगर परिषद चिखली आणि देऊळगाव राजा येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. चिखली अग्निशमन दलातील प्रवीण जाधव, दत्तात्रय कणखर, पांडुरंग सोलंकी आणि देऊळगाव राजा अग्निशमन दलातील भगवान मापारी यांच्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली. जर अग्निशमन दलाने वेळेवर कारवाई केली नसती, तर सैलानी परिसरातील अनेक दुकाने आणि झोपड्यांमध्ये आगीचा फैलाव होऊन मोठा हानी झाली असती. आठ दिवसांवर सैलानी बाबा संदल व यात्रेचा उत्सव येऊन ठेपल्यामुळे या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर आग घरगुती गॅसच्या अनधिकृत भरतीमुळे लागल्याचे बोलले जात आहे. या घटनेने अनधिकृत गॅस भरतीच्या धोक्याबाबत जनतेत चिंता निर्माण केली आहे. प्रशासनाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
0 Comments