शिवाजी कॉलेजजवळील आग मोठी दुर्घटना टळली; शॉर्टसर्किट असल्याचा अंदाज

 

चिखली : श्री शिवाजी कॉलेज परिसरात आग, अग्निशमन दलाची तत्परता रोखली मोठी दुर्घटना



चिखली /( छोटू कांबळे ): चिखलीतील श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय (सिनियर कॉलेज) कमानी जवळील गार्डनला आज रात्री अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. महाविद्यालयाजवळील बांबूच्या झाडांना लागलेल्या या आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सदर घटना आज १८ एप्रिल रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली. आगीने काही काळातच रौद्र रूप धारण केले असते, परंतु अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ पोहोचून आग आटोक्यात आणली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जर अग्निशमन दलाने तत्काळ कारवाई केली नसती तर आगीचा धोका अधिक मोठा झाला असता.

आगीमुळे कोणतीही मोठी हानी झाली नसल्याचे प्राथमिक अंदाज असून, पुढील तपासणी सुरू आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


अग्निशमन दल व सामाजिक कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने टळला अनर्थ

चिखली नगर पालिका अग्निशमन दलाचे श्री प्रविण जाधव, राहुल गवई, पांडुरंग सोळंकी, तुषार गवई यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच
सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे, प्रशांत ऐकडे, दत्ता सुसर, अजय खरपास, गणेश भवर आणि इतरांनीही मदतीचा हात पुढे करत संभाव्य धोका रोखला.





Post a Comment

0 Comments