चिखलीत राऊतवाडी परिसरातील एसबीआय एटीएम फोडले
रात्री मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांचा धाडसी प्रयत्न, आज दुपारी उघडकीस आली घटना
डॉग स्कॉड व ठसे तज्ज्ञ घटनास्थळी, मात्र गुन्हा अद्याप दाखल नाही
चिखली/(छोटू कांबळे/ द बातमीवाला)/- चिखली शहरातील राऊतवाडी परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, आज दुपारी (२१ सप्टेंबर) तीन वाजताच्या सुमारास स्थानिकांना कळाल्यानंतर प्रकरण समोर आले. प्राथमिक माहितीनुसार या एटीएममध्ये तब्बल दहा लाख रुपयांची रोकड होती. मात्र नेमकी किती रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अद्याप संबंधित प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान, घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून, डॉग स्कॉड व ठसे तज्ज्ञांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
0 Comments