NCP AP : “विदर्भातील ओबीसी चळवळीस नवे बळ; दत्ता खरात यांच्यावर प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी”

दत्ता खरात यांची राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड

“अजितदादांचा विश्वास – दत्ता खरात यांच्याकडे ओबीसी विभाग प्रदेश सरचिटणीसपदाची धुरा”

“ओबीसी समाजाचा ठोस आवाज बनणार दत्ता खरात – राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा सन्मान”




बुलढाणा (छोटू कांबळे/ द बातमीवाला) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या ओबीसी विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी बुलढाणा जिल्ह्यातील ओबीसी चळवळीत कार्यरत असलेले दत्ता खरात यांची निवड करण्यात आली आहे. मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील विश्रामगृहावर झालेल्या कार्यक्रमात ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या उपस्थितीत, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष व बुलढाणा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांच्या हस्ते दत्ता खरात यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
दत्ता खरात यांच्या निवडीमुळे केवळ बुलढाणा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील ओबीसी संघटनांना बळकटी मिळणार आहे. ओबीसी समाजातील विद्यार्थी, कर्मचारी आणि अधिकारी यांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी ठोस पातळीवर आवाज उठविण्यासाठी या नियुक्तीचा मोठा फायदा होणार असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना दत्ता खरात म्हणाले की, "पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो. उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार , प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, ना. छगनराव भुजबळ, पालकमंत्री ना. मकरंद आबा पाटील, आमदार मनोज कायदे, आमदार संजय खोडके, प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे आणि प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी या सर्वांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी खंबीरपणे पार पाडीन. ओबीसी समाजाच्या हक्काच्या प्रश्नांवर न्याय मिळवण्यासाठी मी अथक प्रयत्न करणार आहे." या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. या निवडीमुळे दत्ता खरात यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments