"गणरायाच्या चरणी शेतकऱ्यांच्या समृद्धीची प्रार्थना – आमदार श्वेताताई महाले पाटील"
चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या मुंबई निवासस्थानी गणरायाचे आगमन ; मतदारसंघासाठी केली समृद्धीची प्रार्थना
मुंबई | (द बातमीवाला) – महाराष्ट्रभर साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई विधाधर महाले पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी श्री वरदविनायकाचे शुभागमन झाले. या प्रसंगी सहकुटुंब विधीवत पूजन, स्थापना आणि आरती करण्यात आली.
सुंदर आरास आणि सजावटीत सजलेल्या या उत्सवात आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी गणरायाच्या चरणी मतदारसंघातील जनतेच्या कल्याणासाठी मनोकामना व्यक्त केल्या. त्यांनी विशेषतः चिखली मतदारसंघावर आलेल्या पावसाच्या संकटातून सुटका होऊन शेतकऱ्यांना समृद्धी मिळावी, सर्वांगीण विकासाला गती मिळावी अशी प्रार्थना केली. या मंगल प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले, आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे सुपुत्र राजन्य महाले यांनी विधीवत पूजन, स्थापना आणि आरती केली.
0 Comments