राष्ट्रीय बेरोजगार दिनी म्हणत चिखलीत युवक काँग्रेसतर्फे अनोखे आंदोलन...
उच्च शिक्षित तरुणांनी चहा, वडापाव, फळांची दुकाने थाटून व्यक्त केला संताप
चिखली/(द बातमीवाला ) : सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील २ कोटी युवकांना रोजगार देण्याची हमी दिली होती. प्रत्यक्षात मात्र देशात युवकांच्या बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत.उच्च शिक्षण घेऊनही हातात नोकरी नसल्याने युवकांना चहा,वडापाव, फळांची दुकाने टाकावी लागत आहे. युवकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त चिखली शहर व तालुका युवक काँग्रेसतर्फे बुधवार 17 सप्टेंबर रोजी चिखली येथील जयस्तंभ चौकात राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शहर व तालुका युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चहा, फळे वडापाव, मकाची कणसे विकून तीव्र संताप व्यक्त केला.
जयस्तंभ चौक येथे मोठ्या संख्येने तरुणांनी उपस्थित राहून वाढत्या बेरोजगारीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. युवकांनी पदवी समारंभाचा शैक्षणिक पोषक परिधान करून "इंजिनिअर चायवाला", "एमबीए वडा पाववाला", "ग्रॅज्युएट फळ विक्रेता" अशा फलकांसह प्रतिकात्मक आंदोलन केले. या माध्यमातून उच्चशिक्षण घेतल्यानंतरही नोकरीसाठी तरुणांना भटकंती करावी लागते, आणि शेवटी छोट्या-मोठ्या व्यवसायावर पोट भरण्याची वेळ येते, ही वस्तुस्थिती मांडण्यात आली. दरम्यान "नोकरी चोर गद्दी छोड", "स्टॉप वोट चोरी", "रोजगार द्या – अन्यथा सत्ता सोडा" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.सरकारने रोजगार निर्मितीसाठी ठोस धोरण आखावे आणि तरुणांच्या भविष्याशी खेळणे थांबवावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या निर्देशानुसार संपन्न कार्यक्रमासाठी चिखली शहर युवक काँग्रेस अध्यक्ष रिक्की काकडे, तालुका अध्यक्ष अंबादास वाघमारे, शिवराज पाटील, विश्वदीप पडोळ, रोहन पाटील, राहुल चवरे, यांच्यासह चिखली विधानसभा समन्वयक प्रा.राजु गवई सर, कुणाल बोंद्रे, माजी अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, विलास कंटूले, जय बोंद्रे, कैलास खराडे, मिलींद पालवे, रामेश्वर भुसारी, संजय गिरी, व्यंकटेश रिंढे, नितीन वाघ, बबलु शेख, सागर साळवे, विकास परराव, सचिन भराड, रोहन गोहर, अमित पवार, क्रिश जोशि, दिलीप अंभोरे, यश गुजर, अविनाश ब्राम्हणे, नितीन गवई, प्रफुल्ल वाकोडे, मंगेश गवई, शेख अजिस, शकील भाई, हादी शेख, अजिम खान, शिवा म्हस्के यांच्यासह असंख्य युवक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. यांची उपस्थिती होती.
शिक्षित तरुणांना रोजगार न मिळणे ही सरकारची अपयशाची कबुली : रिकी काकडे
देशात वाढती बेरोजगारी ही आज सर्वात मोठी समस्या असून शिक्षित तरुणांना रोजगार न मिळणे ही सरकारची अपयशाची कबुली आहे. मागील दहा वर्षांत रोजगाराच्या नावाखाली केवळ खोटे आश्वासन दिले गेले. आज लाखो तरुणांच्या हाताला काम नाही, त्यामुळे त्यांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. युवकांच्या रोजगारावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आल्याचे, चिखली शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष रिकी काकडे यांनी सांगितले.
0 Comments