चालत्या टाटा मॅजिकने घेतला पेट !

चिखलीत पंचमुखी महादेव मंदिरासमोर चालत्या टाटा मॅजिकला पेट ; स्थानिकांनी आग आटोक्यात आणली





चिखली /( छोटू कांबळे) : चिखली शहरातील पंचमुखी महादेव मंदिरासमोर आज रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी एक गंभीर घटना घडली. चालत्या टाटा मॅजिक गाडीने अचानक पेट घेतला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत वेगळीच पाणी टाकून आग आटोक्यात आणली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रारंभिक माहितीनुसार, गाडीला अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाने धाव घेतली. अधिक तपास सुरू असून, गाडीचे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे, अशी प्रतिक्रिया घटनास्थळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments