महिला तक्रारदाराच्या मदतीने एसीबीची कारवाई ; २,५०० रुपयांच्या लाचप्रकरणी अधिकारी ताब्यात
चिखली /(छोटू कांबळे ) : चिखली पंचायत समिती अंतर्गत समाज कल्याण तथा महिला व बालविकास विभाग कार्यालयातील एका अधिकाऱ्यावर आज दिनांक २६ मे रोजी एसीबीने मोठी कारवाई केली. आरोपी अधिकारी राजपूत याला दुपारी ५:१५ वाजता एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार अडीच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
ही कारवाई बुलढाणा एसीबीच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. तक्रारदार महिलेने संबंधित कामासाठी मागणी करण्यात आलेल्या लाचेची तक्रार केली होती. त्यानंतर एसीबीच्या पथकाने नियोजनपूर्वक सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेमुळे समाज कल्याण विभाग आणि पंचायत समितीमध्ये खळबळ उडाली असून अधिक चौकशी व पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात प्रकाशित करण्यात येईल.
0 Comments