CHIKHALI BJP : चिखली भाजप महिला युवा मोर्चाच्या माजी तालुकाध्यक्ष द्वारकाताई भोसले यांचा राजीनामा !

सौ . द्वारकाताई भोसले यांचा भाजपच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा ; कौटुंबिक अडचणींमुळे द्वारकाताई भोसले भाजपमधून बाहेर



चिखली/( द बातमीवाला) :   भाजपा महिला युवा मोर्चाच्या माजी चिखली तालुकाध्यक्ष तथा केळवदच्या माजी सरपंच सौ. द्वारकाताई संजय भोसले यांनी भाजपच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे. बुलढाणा भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, तसेत महिला युवा मोर्चाच्या चिखली तालुकाध्यक्ष, माजी पंचायत समिती सभापती सौ.सिंधुताई तायडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.

गेल्या काही वर्षापासून भारतीय जनता पार्टी चिखली तालुका येथे पक्षीय पदाधिकारी म्हणून मी पक्षांमध्ये सक्रिय कार्य केले आहे. आज रोजी पर्यंत हे कार्य अखंड सुरू राहिले. सध्या मी काही कौटुंबिक अडचणी व पतीचे आजारपणामुळे पक्ष कार्यास पाहिजे तसा वेळ देऊ शकत नाही. घरगुती कामामध्ये जास्तीत जास्त वेळ देणे क्रमपाप्त असल्याचे द्वारकाताई भोसले यांनी सांगितले आहे. पक्षामध्ये कार्य करण्याचा अनुभव चांगला राहिला. सर्वांच प्रेम स्नेहभाव सातत्याने मिळाला. मात्र कौटुंबिक अडचणीमुळे राजीनामा देण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. राजीनाम्याचा स्विकार करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments